Type Here to Get Search Results !

नगरपरिषद निवडणुकीदरम्यान जात, धर्म वा भाषावार शिबिरावर बंदी - जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

नगरपरिषद निवडणुकीदरम्यान जात, धर्म वा भाषावार शिबिरावर बंदी - जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार






अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव 


जयनारायण दरक 


धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक काळामध्ये कोणत्याही प्रकारचे जात, धर्म किंवा भाषावार शिबिर, सभा किंवा मेळावे आयोजित केल्यास समाजात तणाव निर्माण होऊन निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून अशा कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.



या बाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२४ रोजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम घोषित केला आहे. हा कार्यक्रम घोषित झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जात, धर्म आणि भाषावार शिबिरे किंवा मेळावे आयोजित करण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. जिल्हाधिकारी पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याने हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. या आदेशानुसार, जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीत जात, भाषा किंवा धार्मिक स्वरूपाचे कोणतेही शिबिर, मेळावा किंवा तत्सम कार्यक्रम आयोजित करण्यास ३ डिसेंबर २०२५ पर्यंत बंदी राहील. हा आदेश संपूर्ण जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीत दि.४ नोव्हेंबर २०२५ ते दि.३ डिसेंबर २०२५ या कालावधीत लागू राहणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली.

========================================



Post a Comment

0 Comments