Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत कार्यालय, मंगरुळ ता. कळंब जि. धाराशिव येथून पुणे व लातूर - धाराशिव एस.टी बसेस सुरू करण्याची राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी.


ग्रामपंचायत कार्यालय,  मंगरुळ ता. कळंब जि. धाराशिव येथून पुणे व लातूर - धाराशिव एस.टी बसेस सुरू करण्याची राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी.
मागणीची दखल घेत कळंब- मंगरूळ - मुरुड- लातूर बस सेवा  उद्यापासून सुरू .






अभय वार्ता वृत्तसेवा/ कळंब


जयनारायण दरक 


कळंब वरील विषयी विनंती करण्यात येते कि, मंगरूळ ता. कळंब जि. धाराशिव हे दहा हजार लोकवस्तीचे गाव आहे चार ते साडे चार हजार मतदार आहेत. कळंब मंगरूळ -गोविंदपूर - खामसवाडी- बार्शी मार्गे पुणे जाणारी व येणारी बस सेवा चालू करण्यात यावी.


तसेच कळंब - मंगरूळ - लातूर हि पण बससेवा -चालू करण्यात यावी. अशी मागणी मंगरूळ ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 या निवेदनात  आपल्या कुशल नेतृत्वाखाली बस सेवा हि उत्कृष्टपणे चालू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आम्हाला कर्तव्यदक्ष पालकमंत्री आपल्या रूपाने मिळाले आहेत.

आपण ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे बससेवा चालू करून आम्हास न्याय द्यावा. अशी विनंती करण्यात आली आहे.


 या निवेदनावर सौ.के. एन. शिंदे सरपंच ग्रा.प. मंगरुळ ता. कळंब, भारत सोनवणे ग्रामसेवक मंगरूळ, वि.वि. कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भागचंद बागरेचा व ग्रामस्थ मंगरूळ यांच्यासह आहेत, या निवेदनातील मागणीप्रमाणे कळंब मंगरूळ , जवळा (खुर्दा) , हासेगाव , नागुलगाव, मुरुड ,लातूर ही बस दिनांक 12 नोव्हेंबर उद्या पासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती कळंब व आगार प्रमुख खताळणी दिली आहे.


कळंब: आगार व्यवस्थापक खताळ साहेब वाहतूक नियंत्रक एस. व्ही. सारूक वाहतूक नियंत्रक चेतन गोसावी यांना निवेदन देत असताना वि.वि कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भागचंद बागरेचा व भागवत बनसोडे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

========================================




 

Post a Comment

0 Comments