Type Here to Get Search Results !

दोन लाखांची लाच घेताना अटक - API सह दोन पोलिस हेडकॉनस्टेबल जाळ्यात - धाराशिव जिल्ह्यात मोठी कारवाई !

दोन लाखांची लाच घेताना अटक - API सह दोन पोलिस हेडकॉनस्टेबल जाळ्यात - धाराशिव जिल्ह्यात मोठी कारवाई !



अभय वार्ता वृत्तसेवा / धाराशिव


जयनारायण दरक 


खुणाच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयाची लाच स्वीकारताना एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस हेडकॉन्स्टेबल लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.


धाराशिव जिल्ह्यातील लोहारा पोलीस ठाण्यात अंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली असून त्याला पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी दुजोरा दिला आहे.


एका गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी या अधिकारी यांनी यापूर्वी पाच लाख घेतले त्यानंतर पुन्हा पैशाची मागणी केली.


संबंधित अधिकारी यांनी गुन्ह्यात अडकवू असे सांगत अनेक लोकांना बोलावून लाखो रुपये उकळले असल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस त्याचा तपास करीत आहेत. 


यात अनेक लोकांना धमकावून पैसे वसूल केल्याचा संशय असून तपास सुरू आहे.

========================================







Post a Comment

0 Comments