Type Here to Get Search Results !

पालकमंत्र्यांच्या एका कॉलने मंगरूळ मार्गे कळंब लातूर बस सुरू

पालकमंत्र्यांच्या एका कॉलने मंगरूळ मार्गे कळंब लातूर बस सुरू






 अभय वार्ता वृत्तसेवा/ मंगरूळ 


जयनारायण दरक


कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील ग्रामस्थांची आगार प्रमुख यांना गेल्या बऱ्याच वर्षापासून निवेदन देऊन कळंब लातूर बस सुरू करण्याची मागणी होत होती.अनेक कारणे सांगून वेळ काढूपणा चालू होता.


मंगरूळ गाव हे दहा हजार लोकसंख्येचे असल्याने व येथील काही विद्यार्थी लातूर येथे शिक्षणासाठी असल्याने नेहमी लातूरला ये -जा होत असल्याने तसेच काही ग्रामस्थ दवाखान्यासाठी लातूरला देखील नेहमी जात असतात व मंगरूळ मधील व्यापारी वर्ग यांना देखील लातूर येथे ये-जा करत लागत असल्याने लातूर वरून गावाकडे येण्याची सोय व्हावी म्हणून ग्रामस्थांची मागणी होती. 


अखेर हे प्रकरण पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापसिंह सरनाईक यांच्याकडे ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या पुढे मांडले.

तात्काळ आगार व्यवस्थापकांना फोन लावून कळंब लातूर बस मंगरूळ मार्गे सुरू करण्याचा आदेश दिला. ग्रामस्थ गावात जायच्या आधी बसची सोय करा. त्यांच्या हस्ते गाडीची पूजा करताना फोटो व्हिडिओ मला पाठवा. असा आदेश दिला ग्रामस्थाची मागणी मान्य झाली. आनंदी होऊन ग्रामस्थ गावाकडे आले.


दुसऱ्या दिवशी सकाळी बुधवारी कळंब लातूर बस मंगरूळ गावात पोहोचली .


गावातील नागरिकांनी बस गावात येतात नारळाचे फाटे गाडीला बांधून नारळ फोडून ए. व्ही. जाधव चालक व डी. बी. देशमाने वाहक यांना फेटे बांधून सत्कार करून कळंब लातूर बस मार्गस्थ झाली.


यावेळी वि.वि. कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भागचंद बागरेचा,बाबुराव जाधव, भागवत झाडके, गोपाळ माने भास्कर जाधव, सतीश जगताप, दादा बनसोडे, उत्तम शिंदे, भागवत बनसोडे व आदी नागरिक उपस्थित होते. 


दोन वर्षापासूनची मागणी अखेर पालकमंत्र्याच्या एका कॉलने मान्य झाली. बस सुरू झाल्यामुळे मंगरूळ ते मुरुड लातूर प्रवास सुखकर झाला आहे.


त्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. पालकमंत्री यांचे कौतुक होत आहे.

=======================================



Post a Comment

0 Comments