वाॅर रूमच्या स्थापनेमुळे धाराशिव जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम होईल - विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा
अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव
जयनारायण दरक
धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अत्याधुनिक “वाॅर रूम” ची स्थापना करण्यात आली असून, या उपक्रमाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेन्द्र मिश्रा यांच्या हस्ते संपन्न झाले. नव्या वाॅर रूममुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्थेचे व्यवस्थापन तसेच निर्णय प्रक्रियेची गती आणि अचूकता यात लक्षणीय वाढ होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटनानंतर मिश्रा यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत सांगितले की, “वाॅर रूम ही आधुनिक पोलीस व्यवस्थेतील एक महत्त्वाची पायरी असून ती गुन्हे तपास, नियोजन आणि आकस्मिक परिस्थिती हाताळण्यासाठी परिणामकारक ठरणार आहे.”
वाॅर रूमची वैशिष्ट्ये व उद्दिष्टे:
गुन्हे तपासात समन्वय: विविध शाखांतील अधिकारी एकत्र येऊन गुन्हे तपास, बंदोबस्त नियोजन आणि आकस्मिक प्रतिसादाचे प्रभावी समन्वयन करतील.
तांत्रिक साधनांचा वापर: फॉरेन्सिक अहवाल, CDR/SDR विश्लेषण, सायबर ट्रेसिंग आणि GIS मॅपिंगच्या साहाय्याने तपास अधिक काटेकोर होईल.
ड्रोन नियंत्रण प्रणाली: मोर्चे, रेड आणि कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान ड्रोनद्वारे थेट दृश्य प्रसारणामुळे घटनास्थळावरील परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होईल.
सांख्यिकीय माहितीचे संकलन: जिल्ह्यातील सर्व गुन्ह्यांची नोंद, गुन्हेगारांची प्रोफाइल आणि तपासाची प्रगती एकत्रितपणे संग्रहीत केली जाईल.
तात्काळ निर्णय प्रक्रिया: कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी अचूक आणि माहितीआधारित निर्णय त्वरीत घेता येतील.
उद्घाटन प्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख (तुळजापूर), संजय पवार (कळंब), अनिल चोरमले (भूम), सदाशिव शेलार (उमरगा), सुरेशकुमार राऊत (धाराशिव शहर), श्रीमती अश्विनी भोसले (आर्थिक गुन्हे शाखा), विनोद इज्जपवार (स्थानिक गुन्हे शाखा), अमोद भुजबळ (जिल्हा विशेष शाखा), शकील शेख (सायबर), प्रमोद भिंगारे (तांत्रिक विश्लेषण शाखा), सोमवंशी (एटीसी) तसेच श्रीमती घोगरे, चासकर, हिंगोले आदी अधिकारी उपस्थित होते.
या वाॅर रूमच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा पोलीस दल अधिक तांत्रिकदृष्ट्या सक्षम व कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
----------------------------------------------------‐-----------------
सौजन्य:
राधा कृष्ण
द वर्ल्ड ऑफ प्युअर व्हेज रेस्टॉरंट
जंत्रे प्लाझा च्या समोर जिजाऊ चौक ढोकी रोड कळंब,
अमित माळी, 9527197374
======================================


Post a Comment
0 Comments