चोरी करणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई !
अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव
जयनारायण दरक
राष्ट्रीय महामार्गावर मध्यारात्री जॅक टाकून प्रवाशांच्या गाड्या बंद पाडून दरोडा टाकून लूटणा-या टोळीच्या मुसक्या आवळन्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना दि.१ नोव्हेंबर रोजी यश आले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत होत्या.
अगदी मध्यरात्री भर राष्ट्रीय महामार्गावरती अशा घटना घडत होत्या. त्यामुळे सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच दि. १६ आक्टोबर रोजीच्या मध्यारात्री उमरग्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका डॉक्टरचे कुटुंबियांना अशाच प्रकारे लुटण्याचा प्रकार घडला होता. त्याबाबत पोलीस ठाणे मुरुम येथे डॉ. अब्दुल गफूर अब्दुल रउफ जनैदी यांच्या तक्रारीवरून गु.र.नं. ३०९/२०२५ क. ३१०(२), ३११, अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक रीतुताई खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी विनोद ईज्जपवार यांना सदरील गुन्ह्याचा तातडीने तपास लावण्याबाबत सुचीत केले होते.
त्या अनुसार पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार यांनी आपले आधिनस्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना सोबत घेवून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आणि त्यांचे प्रयत्नांना आज यश आले. सदरील गुन्हा उघडकीस आणण्याकरिती तांत्रिक माहिती प्राप्त करून त्याचे विश्लेषण करण्यात आले तसेच पारंपारीक पध्दतीचा देखील वापर करून गन्ह्यातील आरोपी आणि वापरलेली वाहन निष्पन्न करण्यात आले. त्यापैकी अर्जून बालाजी शिंदे, आशोक हिरामन शिंदे यास ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी पोलीस ठाणे मुरूम हद्दीतील दरोडा ईतर चार साथीदारांच्या मदतीने घातल्याचे कबुल केल तसेच त्यांनी जळगाव जिल्ह्यातही अशाच प्रकारे राष्ट्रीय महामार्गावरती जॅक टाकून गाडी अडवून दरोडा टाकल्याची माहिती दिली.
मुरूम येथील गुन्ह्यात वापरलेली XUV500 गाडी आणि जॅक जप्त करण्यात आलेला आहे. त्यासोबतच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या दरोड्यातील ट्रक देखील जप्त करण्यात आलेला आहे.
सदरील कामगिरी श्रीमती रीतुताई खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद ईज्जपवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सुदर्शन कासार स.पो.नि.,पोलीस अंमलदार शौकत पठाण, पोलीस अंमलदार जावेद काझी, महीला पोलीस अंमलदार शोभा बांगर, पोलीस अंमलदार फरहान पठाण, पोलीस अंमलदार राठोड, चालक पोलीस अंमलदार सुभाष चौरे,, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड, चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरे, चालक पोलीस अंमलदार नागनाथ गुरव. सदरील कामगीरी यशस्वीरित्या पार पाडण्यात QRTआणि RCP पथकाने महत्वपूर्ण भुमिका बजावलेली आहे.
=========================================
सौजन्य:
राधा कृष्ण
द वर्ल्ड ऑफ प्युअर व्हेज रेस्टॉरंट
जंत्रे प्लाझा च्या समोर जिजाऊ चौक ढोकी रोड कळंब,
अमित माळी, 9527197374
========================================
=========================================


.jpg)
Post a Comment
0 Comments