Type Here to Get Search Results !

उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा सत्कार

उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा सत्कार



अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव 


जयनारायण दरक 


 छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेन्द्र मिश्र यांच्या हस्ते धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित मासिक गुन्हे परिषदेच्या वेळी धाराशिव पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.


या प्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेने तुळजापूर येथील लोकमंगल बँकेतील चोरी प्रकरण उघडकीस आणून चोरीस गेलेली मालमत्ता जप्त केल्याबद्दल प्रभारी अधिकारी शविनोद ईज्जपवार आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक करण्यात आले.


तसेच पोलीस ठाणे परंडा येथील खूनाचा गुन्हा (गु.र.न.२५२/२०२३ क. ३०२) उघडकीस आणून आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा मिळवून देणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे यांचाही सत्कार करण्यात आला.


स.पो.नि. सुदर्शन कासार आणि त्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने वाशी येथे १४ किलो गांजा जप्त केल्याबद्दल त्यांनाही प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.


त्याचप्रमाणे पोलीस ठाणे परंडा प्रभारी अधिकारी आसाराम चोरमले आणि येरमाळा प्रभारी अधिकारी संग्राम भालेराव यांनी त्यांच्या टीमसह अवैध अग्नीशस्त्र जप्त केल्याबद्दल गौरव मिळविला.


या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर,उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख (तुळजापूर),संजय पवार (कळंब), अनिल चोरमले (भूम), सदाशिव शेलार (उमरगा),सुरेशकुमार राऊत (धाराशिव शहर),श्रीमती अश्विनी भोसले (आर्थिक गुन्हे शाखा) तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

========================================

सौजन्य;

 गायत्री फर्निचर कळंब 

ऋषिकेश पांचाळ ,

8999547491

राजाभाऊ पांचाळ

9657771242



=======================================



Post a Comment

0 Comments