Krushi Mitra Yojana : स्वत:च्या गावातच काम करा, १८,००० रु मानधन मिळवा, कृषीमंत्र्यांकडून नवीन योजनेची घोषणा, पात्रता काय? माहिती आली समोरराज्यातील शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळावे आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, यासाठी राज्याच्या कृषी विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
अभय वार्ता / मुंबई
राज्यातील शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळावे आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, यासाठी राज्याच्या कृषी विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक गावात ‘कृषी मित्र’ नियुक्त करण्याची नवी योजना राबवण्यात येणार असून यामुळे तरुण शेतकऱ्यांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पत्रकार परिषदेत योजनेची घोषणा
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दत्तात्रय भरणे यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन, तसेच सरकारी योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आधीच हजारो कृषी पर्यवेक्षकांची नियुक्ती
भरणे यांनी सांगितले की, राज्यात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ११,५८७ कृषी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘आत्मा’ योजनेअंतर्गत आता ‘कृषी मित्र’ किंवा ‘शेतकरी मित्र’ नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
=========================================
.jpg)
Post a Comment
0 Comments