Type Here to Get Search Results !

निष्क्रिय अधिकारी काय कामाचे...? सामाजिक कार्यकर्ते राजकुमार तुपसमुद्रे यांचा प्रशासनास खडा सवाल

 निष्क्रिय अधिकारी काय कामाचे...? 

 सामाजिक कार्यकर्ते राजकुमार तुपसमुद्रे यांचा प्रशासनास खडा सवाल





 अभय वार्ता / धाराशिव 

सामाजिक कार्यकर्ते  राजकुमार तुपसमुद्रे माळकरंजा यांनी दिलेल्या निवेदनत असं म्हटले आहे की ज्या गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना दिलेली वाटून गावेमाळकरंजा गावात ते जनतेचा मूलभूत पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नाहीत तर अशा अधिकाऱ्यांना

बिनपगारी ठेवले पाहिजे तरच ते काम करतील व वीसी चालू आहे मीटिंग चालू आहे कशाची मीटिंग करतात हे पण पाहिले पाहिजे व त्यांना प्रत्येक गावात काय समस्या आहेत याचे देखील भान नाही. योजनेच्या नावाने दोरे करतात त्यांची योग्यता आहे का नाही ते देखील तपासले पाहिजे कारण की ते लोकांच्या आरोग्याची व पाण्याची देखील समस्या सोडू शकत नाहीत असे अधिकारी खुर्चीला बोज आहेत. अशा अधिकाऱ्यांची खुर्ची खाली करून कर्तव्यदक्ष अधिकारी भरले पाहिजे जेणेकरून सामान्य नागरिकांना आरोग्य व पाण्यासाठी उपोषणाला बसण्याची गरज पडणार नाही.


अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार तुपसमुद्रे माळकरंजा यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे केली आहे..

Post a Comment

0 Comments