सैनिक विद्यालय निवड चाचणीत ईटकुर प्रशालेचे यश
अभय वार्ता कळंब
कळंब तालुक्यातील इटकूर येथील जि प प्रशालेचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सार्थक दयानंद जाधव याने 2025 - 26 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूरच्या निवड चाचणी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे या बद्दल जि प प्रशाला व शालेय व्यवस्थापन समिती ईटकुर व ग्रामस्थ यांच्या वतीने सार्थक चे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आले या विद्यार्थ्याला यश मिळवण्यासाठी प्रशालेचे शिक्षक बाबासाहेब गावकरे यांचे मार्गदर्शन लाभले .
या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे सर्व शिक्षक कर्मचारी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब पावले व समितीचे सदस्य त्याचबरोबर विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments