मोहा येथे उद्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन
अभय वार्ता / कळंब
जयनारायण दरक
महसूल विभागामार्फत नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करून शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीराचे आयोजन कळंब तालुक्यातील मोहा येथे उद्या शुक्रवारी संपन्न होणार आहे . शिबिरात महसूल, भूमी अभिलेख, ग्रामविकास, कृषी, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, महावितरण, एस.टी. महामंडळ, आरोग्य, शिक्षणसह व इतर विविध १९ विभागातील सेवा पुरविण्यात येणार आहेत .
या शिबिरामध्ये ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांच्या महसुली विभागाशी संबंधित विविध समस्या व तक्रारीवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी तहसील कार्यालयाने सर्व विभागांशी समन्वय साधल्यामुळे महसूलसह, भूमी अभिलेख, ग्रामविकास, कृषी, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, महावितरण, एस.टी. महामंडळ, आरोग्य, शिक्षणसह व इतर विविध १९ विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील .
कार्यक्रमासाठी कळंब उपविभागीय अधिकारी श्री. गणेश शिंदे, तहसीलदार कळंब श्री. हेमंत ढोकले, अप्पर तहसीलदार श्रीमती प्राजक्ता पाटील, नायब तहसीलदार श्री.गोकुळ भराडिया व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील. मोहा मंडळातील मंडळ अधिकारी कल्पना मुंडे व सर्व ग्राम महसूल अधिकारी शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभाग घ्यावा व आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन मंगरूळ ग्राम महसूल अधिकारी राहुल निकम यांनी नागरिकांना यानिम्मित केले आहे.
========================================

.jpg)
Post a Comment
0 Comments