संसार बहरण्यापूर्वीच नियोजित नववधू -वरांचा 'काळाने 'घेतला वेध...
अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव
जयनारायण दरक
वाशी तालूक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मूलगा अक्षय आणि इजोरा रहिवाशी हल्ली मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मूलगी अक्षया यांचा गेल्या रविवारी (ता.१५) मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता.
मयत नववधू अक्षया हिची आज लातुर येथे महापारेशनची परीक्षा होती परीक्षा देण्यासाठी वाशी येथन पहाटेच घरची टाटा नेक्सॉन गाडी क्र. एम एच २५ बी एफ ५०६४ गाडीतून जात असताना हा अपघात झाला रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली.धडक इतकी जोरदार होती की कारचा पूढील भाग पूर्णपणे चुरडला गेला नववधू अक्षया सुनील चव्हाण (वय.२३) आणि वर मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे याचा (वय. २५) अपघातात जागीच मृत्यू झाला.
तर चालक अक्षय यादव सिरसट (वय. २२)जखमी झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच रत्नापर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले जखमी चालकाला १०८ ला कॉल करुन उपचारासाठी पाठवले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा प्राथमिक रुग्णालयात पाठवला. चार दिवसांपूर्वीच साखरपूडा झालेल्या तरुणीच्या अकाली मृत्यूने वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
---------------------------------------------------------------------


Post a Comment
0 Comments