Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 कळंब मध्ये चोख बंदोबस्त. अधिकारी व कर्मचारी एकूण 53 कर्मचारी तैनात.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 कळंब मध्ये चोख बंदोबस्त. अधिकारी व कर्मचारी एकूण 53 कर्मचारी तैनात.



अभय वार्ता वृत्तसेवा/ कळंब


कुठलाही सण-उत्सव म्हटलं की पोलीस बंदोबस्त आलाच! सार्वजनिक कार्यक्रम म्हटलं की खाकी वर्दी हजरच… यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कळंब शहरातही पोलीस प्रशासनाने आदर्श नियोजन करत कार्यक्रम सुरळीत पार पाडला.

डी.जे.च्या कर्कश आवाजाला बगल देत संस्कृती जपत पार पडलेल्या जयंती सोहळ्यात कुठलाही गालबोट लागू न देता नागरिकांना उत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होते. या कौतुकास्पद कामगिरीमुळे संपूर्ण शहराला शिवजयंतीचा आनंद सुरक्षित वातावरणात घेता आला.


डी.वाय.एस.पी. संजय पवार साहेब, पी.आय. अजित चिंताले साहेब, ए.पी.आय. मगर साहेब, फुंडगे मॅडम, पी.एस.आय. पठाण साहेब, घाडगे साहेब, क्विक ॲक्शन फोर्स विशेष व आणि स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा विशेष शाखा हे पथक नेमण्यात आली होती. .वाखाणण्याजोगे ठरले.


शहरातील एक सामाजिक संघटना म्हणून जनतेच्या सुरक्षेसाठी 24 तास उभा असणाऱ्या या वेळी धाराशिव प्रेस क्लब शाखा कळंब यांच्या वतीने अल्प उपहार व पाणी बॉटल वाटप करण्यात आले त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यां सोय झाली व कळंब पोलीस ठाणे वतीने सकाळी ची जेवणाची सोय केली होती.

Post a Comment

0 Comments