Type Here to Get Search Results !

ई.के.वाय.सी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर.

ई.के.वाय.सी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर.




अभय वार्ता वृत्तसेवा /वाशी


 ऑगस्ट,सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान मदत अनुदान यादी शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या होत्या परंतु त्यातील काही सामाईक खातेदार,मयत वारसा खातेदार, स्थलांतरित खातेदार हे काही तांत्रिक अडचणीमुळे फार्मर आयडी प्रलंबित असल्यामुळे अनुदान वितरणास विलंब लागत होता. 


परंतु नुकतीच शासनाने ई केवायसी साईट सुरू झाल्यामुळे प्रलंबित राहिलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ ई केवायसी पूर्ण करून घ्यावी. तसेच मयत खातेदारांच्या वारसांनी तात्काळ वारस फेरफार करून घ्यावे.असे आवाहन सारोळा मांडवा सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी डि.व्ही.सिरसेवाड पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments