अभय वार्ता वृत्तसेवा/धाराशिव दि.09
धाराशिव जिल्ह्यातील साई कला केंद्रात काम करणाऱ्या महिलेसोबत (नृत्यांगन) असलेल्या प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोराखळी परिसरात घडलेल्या या प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
आश्रुबा अंकुश कांबळे (वय ३९ वर्षे राहणार रुई,ढोकी) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. प्राथमिक माहितीनुसार, मृतक अंकुश कांबळे व त्याची मैत्रीण — जी साई कला केंद्रात नृत्य काम करते — हे दोघे शिखर शिंगणापूर येथे काल देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून परतत असताना दोघांमध्ये तीव्र वाद झाल्याचे समजते.
दरम्यान, प्रियकराच्या विवाहित बायकोचा आलेल्या फोनवरून मोठा वाद निर्माण झाला. वादाच्या भरात “आत्महत्या करतो” अशी धमकीही मृतकाने दिली होती. मात्र प्रियसीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा चोराखळी येथे तरुणाने गळफास घेऊन जीव दिला.
येरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
======================================

.jpg)
Post a Comment
0 Comments