Type Here to Get Search Results !

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात.


येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात.




 अभय वार्ता वृत्तसेवा/येरमाळा 


सुधीर लोमटे


महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान नागपूर विद्यापीठाचे माफसू यशोगाथा हे पुस्तक १९ डिसेंबर ला उदगीर येथे डॉ.एन रामास्वामी सचिव पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य,डॉ.नितिन पाटील कुलगुरू माफसू नागपूर,डॉ. देवरे आयुक्त पशुसंवर्धन,माजी विस्तार संचालक डॉ.अनिल भिकाणे मान्यवरांच्या उपस्थितित प्रकाशित झाले आहे.यामध्ये येरमाळा येथील दुग्धव्यावसायिक विजय बारकुल यांची यशोगाथा प्रकाशित करण्यात आली आहे. 

येरमाळा (ता.कळंब,जि.धाराशिव) विजय बाबासाहेब बारकुल (वय २८) याचे शिक्षण बी.सी.एस.झाल्या नंतर नोकरीची वाट न पाहता घरची ऐक एकर जमिनीवर दुग्धव्यावसाय सुरु करु आज यशस्वी व्यावसायिक आहे.


वडील बाबासाहेब प्रल्हाद बारकुल (नोकरीत),आई सत्यभामा बाबासाहेब बारकुल (गृहिणी) आणि भाऊ प्रशांत बाबासाहेब बारकुल (दुग्ध व्यवसायात मदतीला) हे त्याचे कुटुंब आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी दुग्ध व्यवसाय सुरु करायचं ठरवलं, गावात आणि आसपासच्या भागात यशस्वी शेतकऱ्यांना पाहून प्रेरणा घेऊन यशस्वी होत.दुग्धव्यवसायात त्याने आदर्श निर्माण केला आहे.


महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर यांचे

माफसू यशोगाथा हे पुस्तकात प्रकाशीत झालेल्या यशोगाथेत विजय बारकुल च्या यशाचा प्रवास मांडला आहे.



व्यवसायाचा प्रवास आणि वाढ

दुधाचा व्यवसाय जानेवारी २०१७ मध्ये एका गायीपासून सुरू केला. वडिलांकडून दोन लाख रुपये घेतले, साधा गोठा बांधला, हळूहळू गोठ्यातील गायी वाढवत नेल्या.दिवसेंदिवस नवनवीन कल्पना सुचल्या.मिळालेल्या पैशातून कडबा कुट्टी मशीन,धाराची मशीन,मॅट्स,एसटीपी स्प्रे वगैरे चांगल्या सुविधा उभ्या केल्या.



नवे प्रयोग व व्यवस्थापन

गौठा हवेशीर ठेवण्यावर भर दिला, जनावरांच्या पोषणासाठी स्वतःच्या शेतात एक एकर जमिनीत चारा लागवड केली सुपर नेपियर गवत अर्ध्या एकरात आणि मका-ज्वारी अर्ध्या एकरात लागवड केली. सायलेज व मुरघास तयार करून चान्याची व्यवस्था केली. सर्व जनावरांसाठी संतुलित आहाराचे वेळापत्रक आखून त्यानुसार व्यवस्थापन सुरू केले. सध्या माझ्या गोठ्यात १० गायी आणि २ कालवडी आहेत.



व्यवसायातील चढउतार

व्यवसायात अनेक अडचणी आल्या, पण जिद्दीने आणि योग्य व्यवस्थापनाने त्यावर मात केली. ऋतुमान बदलाचे परिणाम सांभाळले. नियमित पशु वैद्यकीय तपासणी आणि योग्य उपचार केल्यामुळे जनावरांची तब्येत चांगली ठेवता आली.स्वच्छता आणि संतुलित आहारामुळे दूध उत्पादन व गुणवत्ता वाढली.त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत विश्वासार्हता निर्माण झाली आणि व्यवसाय अधिक बळकट झाला.



एका गायीपासून स्वप्नांची भरारी खर्च आणि उत्पन्न

दररोज सुमारे १५० लिटर दूध उत्पादन होते. त्यापैकी ७० लिटर दूध स्वताच्या दूध विक्री केंद्रातून ४० रुपये प्रतिलिटर दराने ग्राहकांना थेट विकतो. उर्वरित दूध 'सह्याद्री कंपनी'च्या संघाला ३२.४० रुपये प्रतिलिटर दराने विकतो, दररोज ५४०० रुपये उत्पन्न मिळते. त्यातील ५०% रक्कम पशुखाद्य, मिनरल मिक्स्चर यासाठी जाते. दूध विक्री केंद्रामुळे शुद्ध, भेसळमुक्त दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतं.



मार्गदर्शन आणि महत्व

गावातील तज्ञ शेतकऱ्यांकडून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भरपूर मार्गदर्शन मिळालं.कुणाल पुंगार्डे (प्रक्षेत्र व्यवस्थापक) यांनी दूधाच्या शुद्धतेबाबत माहिती दिली.डी.शिवकुमार यंकम यांचं सतत मार्गदर्शन लाभलं.त्यांनी जनावरांचे आजार लवकर ओळखून तातडीने उपचार करण्याचं महत्त्व शिकवलं.



कुटुंबीयांचा व मित्रांचा पाठींबा

या यशामध्ये विजयचा भाऊ प्रशांतचा खूप मोठा हातभार आहे.वडील,आई,शेजारी आणि मित्र मंडळींनी नेहमीच साथ दिली.त्यांनी दिलेला आधार हीच माझ्या यशाची खरी उर्जा आहे.


डॉ.अनिल भिकाने यांनी दुग्धव्यवसायाला दोन वेळा भेट देत कालवड पैदास, खनिज मिश्रण,दूध वाढीसाठी पशुआहार यावर मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या सुचनामुळे फॅट वाढले आणि उच्च अनुवंशिकतेच्या कालवाड पैदाशीवर भर देतोय, गोचीड निर्मूलन, लसीकरण यावर मार्गदर्शन लाभले, भविष्यात २० गाईंचा मुक्त गोठा उभारण्याचे नियोजन आहे.२९ जून २०२३ रोजी ढोकी,ता.धाराशिव येथे डॉ.भिकाने यांच्या हस्ते सत्कार झाला.



कुटुंबीयांचा व मित्रांचा पाठींबा

या यशामध्ये माझ्या भावाचा खूप मोठा हातभार आहे.वडील,आई,शेजारी आणि मित्र मंडळींनी नेहमीच साथ दिली.त्यांनी दिलेला आधार हीच माझ्या यशाची खरी उर्जा आहे.


महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर

(संचालक,विस्तार शिक्षण)

डॉ.अनिल भिकाने मार्गदर्शन लाभले.



यशोगाथेत विजयने या व्यवसायात यश एका दिवसात मिळत नाही,पण जर चिकाटीने प्रयत्न केला,स्वतःवर विश्वास ठेवला,तर एक दिवस नक्कीच यशस्वी होऊ शकता.त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करा,कुटुंबाला आर्थिक बळ द्या.असा संदेश दिला आहे.


मार्गदर्शक

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर

(संचालक,विस्तार शिक्षण)

डॉ.अनिल भिकाने मार्गदर्शन केले.

======================================



Post a Comment

0 Comments