७ जखमी, २ जणांची प्रकृती गंभीर!
अभय वार्ता वृत्तसेवा /कळंब
जयनारायण दरक
कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात काल सोमवारी मोठी दुर्घटना घडली. लातूर -कळंब राज्य मार्गावरील खडकी शिवारात एका अज्ञात वाहनाने रस्त्याकडेला थांबलेल्या सात ऊसतोड मजुरांना जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात दोन मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
हावरगाव येथील साखर कारखान्यासाठी शंकर डोंगरे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू होती.
मंगरूळ येथील हे मजूर काम संपवून कळंब येथील सोमवारच्या आठवडी बाजार करण्यासाठी जाण्याच्या तयारीत होती.
उसाचा ट्रॅक्टर कारखान्याकडे रवाना करून हे सर्वजण रस्त्याच्या कडेला वाहनाची वाट पहात उभे होते.
मात्र, अचानक भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली.
अतुल साहेबराव पवार 30 वर्षे,
नेताजी मोतीराम पवार 35 वर्ष,
इश्वर प्रभु पवार 33 वर्ष, ताई सुरेश पवार 45 वर्ष,प्रभू मुरली पवार 50 वर्ष ,जनाबाई प्रभू पवार 43 वर्ष, शिवाजी मोतीराम पवार 40 वर्ष,
हे ऊसतोड कामगार जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच कळंब उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले.
डॉक्टरांच्या तत्पुरतेमुळे पाच जणांचे प्राण वाचवण्यात यश आले असून,
दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments