अभय वार्ता वृत्तसेवा/ धाराशिव
जयनारायण दरक
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक २०२५ चे अनुषंगाने निवडणुक आदर्श आचार सहिंतेच्या काळात दि.३० नोव्हेंबर रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक जि.धाराशिव विभागाने विभागाचे मा. आयुक्त, श्री. डॉ.राजेश देशमुख, मा. श्री. प्रसाद सुर्वे सहआयुक्त, (दक्षता व अंमलबजावणी) राज्य उत्पादन शुल्क,श्रीमती संगीता दरेकर, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, छ. संभाजीनगर विभाग छ. संभाजीनगर, श्री.हर्षवर्धन शिंदे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि. धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली मस्सा खंडेश्वरी, येथे हातभट्टी निर्मिती रसायन जप्त करून ०२ गुन्हे नोंदविले असून कलम ६८ व ८४ चा गुन्हा नोंद केला आहे.
तसेच कळंब शहर परिसर जि.धाराशिव येथे होणारी अवैध मद्य वाहतुक पकडुन ०१ वारस गुन्हा नोंद करुन ०१ आरोपी महादेव साहेबराव भोगले, वय ५४ वर्षे रा. लोहटा (पुर्व) ता.कळंब जि.धाराशिव.याला कळंब बस स्टँड समोर, सायंकाळी ६.३० ते ७.३० चे दरम्यान अटक करण्यात आली असुन त्यांचे ताब्यातुन विविध विदेशी/देशी मद्याच्या १२० बॉटल जप्त करून एक मारुती सुझुकी स्विफ्ट वाहन जप्त केले आहे. असा एकुण रु.७,८४,७६०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर ची कारवाई श्री.हर्षवर्धन शिंदे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि. धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण ढोकरे, प्र.निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जि. धाराशिव, सोबत ए.ए. गवंडी, टी.एच. नेर्लेकर, ए.सी.खराडे, ए.डी. गटकांबळे, संतोष कलमले, महिला जवान ऐश्वर्या इंगळे, यांनी सदरची कारवाई यशस्वी केली असुन पुढील तपास बाळकृष्ण ढोकरे, प्र.निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जि. धाराशिव हे करीत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक २०२५ चे कालावधीत अवैध मद्य निर्मीती वाहतुक व विक्रीबाबतची माहिती या कार्यालयास कळविणेबाबत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि. धाराशिव यांनी जनतेला आवाहन केले आहे.
========================================

Post a Comment
0 Comments