Type Here to Get Search Results !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 62 वा वाढदिवस मा. श्री. विश्वनाथ अण्णा तोडकर सचिव - पर्याय सामाजिक संस्था राष्ट्रीय अध्यक्ष - महाराष्ट्र लोकविकास मंच Md - अनिक फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 
62 वा वाढदिवस मा. श्री. विश्वनाथ अण्णा तोडकर सचिव - पर्याय सामाजिक संस्था राष्ट्रीय अध्यक्ष - महाराष्ट्र लोकविकास मंच Md - अनिक फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि.


   शुभेच्छुक -

 विकास महारुद्र

 कुदळे

 मुख्यलेखाधिकारी

 अनिक

 फायनान्शियल 

 सर्विसेस प्रा लि.

 धाराशिव जिल्हा.


🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️

==========================================
धाराशिव जिल्ह्यातील नगरपालिकेच्या लढतीकडे राज्याचे लक्ष ! अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार ?






अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव

जयनारायण दरक 


धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, धाराशिव, परंडा आणि कळंब या चार नगरपालिकांच्या निवडणुका सध्या चांगल्याच चर्चेत असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतींकडे वेधले गेले आहे. अटीतटीच्या या चौकारामध्ये कोण बाजी मारणार ? याची राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.



या बाबत सविस्तर वृत्त असे की, तुळजापूर नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत पाहायला मिळत आहे. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू गंगणे यांच्यासह अन्य नगरसेवक पदाच्या प्रचारासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील, अर्चनाताई पाटील, युवा नेते मल्हार पाटील यांनी हायटेक प्रचारयंत्रणा उभी केली आहे. तर तुळजापूर नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मगर यांच्यासह अन्य नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील आणि काँग्रेसचे धीरज पाटील यांनी तगडा फौजफाटा उभा केला आहे. या तगड्या लढतीत कोणाच्या माथी गुलाल लागणार ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



धाराशिव नगरपालिकेच्या रणधुमाळीतही तुफान चुरस पाहायला मिळत आहे. भाजपाच्या कमळाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार राणाजगजितसिंह पाटील, अर्चनाताई पाटील, युवा नेते मल्हार पाटील आणि दत्ता कुलकर्णी यांनी मोठी फिल्डींग लावली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मशालीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उबाठा शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील आणि नंदूराजे निंबाळकर यांनी डोअर-टू-डोअर प्रचाराने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. राष्ट्रवादीच्या तुतारी गटानेही जोरदार तयारी केली असून, वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची टीम विशेष सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. परंडा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी मंत्री तानाजीराव सावंत यांना रोखण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत शहर आघाडीची निर्मिती केली आहे. या एकत्रित लढतीमुळे परंड्यातील स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे.



कळंब नगरपालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेचा धनुष्यबाण, अजित पवार गटाचे घड्याळ आणि उबाठा शिवसेनेची मशाल या तिन्ही गटांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तिरंगा सामना रंगतदार बनला आहे. मतदारांची मने जिंकण्यासाठी सर्व गटांनी जोरदार प्रचारयंत्रणा उभारली आहे. या चारही नगरपालिकांतील राजकीय समीकरणे, प्रचारातील नाविन्यपूर्ण पद्धती आणि स्थानिक नेतृत्व यामुळे लढतीला अधिक रंग चढला असून, अंतिम निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे डोळे लागले आहेत.

========================================

Post a Comment

0 Comments