मोठी बातमी ! वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी केवळ 200 रुपयात, सरकाराचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
अभय वार्ता वृत्तसेवा
Ancestral Land Shares just 200 Rupees: वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्श्यांच्या मोजणीसाठी मोठा खर्च येतो. वाद असेल तर मग मोजणीसाठी दोन्ही पक्षांना मोठा खर्च करावा लागतो. पण आता राज्य सरकारने यासंदर्भात शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
Chandrashekhar Bawankule: वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता माफक दरात होणार आहे. शेतकरी कुटुंबात जमिनीच्या पोटहिश्शांबाबत मोजणी करण्यात येते. त्यात वाद असेल तर मग झटपट नोंदणी करावी लागते. या सर्वांसाठी मोठा खर्च येतो.
पण आता वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी अत्यंत कमी दरात म्हणजे केवळ प्रति पोटहिस्सा 200 रुपयांत होणार आहे. राज्य सरकारच्या नवीन निर्णयांची माहिती संबंधित जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाला देण्यात आली आहे. या नवीन निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यात पोटहिस्सा मोजणीसाठी जेव्हा अर्ज येईल, तेव्हा त्यासाठी शेतकऱ्यांना केवळ 200 रुपये द्यावे लागतील.
यापूर्वी वडिलोपार्जित पोटहिस्सा मोजणीसाठी 1 हजार रुपये ते 14 हजार रुपयांपर्यंत खर्च येत होता. या मोठ्या खर्चामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भारत पडत होता.
केवळ मोजणीसाठी त्यांना मोठी रक्कम मोजावी लागत होती. भूमी अभिलेख विभागाने आता शुल्क संरचनेत मोठा बदल केला आहे. पोटहिस्सा मोजणीसाठी आता केवळ 200 रुपये खर्च येणार आहे. हा निर्णय आता राज्यभर लागू करण्यात आला आहे.
========================================
Post a Comment
0 Comments