अभय वार्ता वृत्तसेवा /शिराढोण
कळंब तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील विनायक राजेंद्र कापसे (वय 53) यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, जयभवानी हॉटेल जवळील जुनी जवळा पाटी परिसरातील देवधानोरा शिवारातून ते पायी जात असताना मोटरसायकल (क्र. एमएच 44 ए.ए. 1442) ने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही मोटरसायकल आरोपी गुरुनाथ राजेभाऊ कसबे (रा. होळ, ता. केज, जि. बीड) यांच्या ताब्यात असून, त्यांनी ती हायगयी व निष्काळजीपणे चालविल्याने विनायक कापसे गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत विनायक कापसे यांचे पुत्र प्रतीक विनायक कापसे (वय 21, रा. मंगरुळ) यांनी 24 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून शिराढोण पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 281, 106(1), 125(अ), 125(ब) सह मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरील घटनेबद्दल पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली.
========================================


Post a Comment
0 Comments