अभय वार्ता वृत्तसेवा / कळंब
कळंब येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी बिरदीचंद हरकचंद बलाई वय ( 85 ) यांचे वृद्ध काळाने दुःखद निधन झाले, बिरदीचंद बलाई यांनी कळंब शहरातील मुलांच्या इंग्रजी
विषयाच्या शिक्षणासाठी प्रोग्रेसिव्ह चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना स्थापना केली संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले, तसेच कळंब सहकारी औद्योगिक वसाहतचे माजी चेअरमन होते.
तसेच जैन समाज संघटनेच्या उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा त्यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले होते, त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले ,एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर मांजरा काठ येथील स्मशानभूमीत दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Post a Comment
0 Comments