Type Here to Get Search Results !

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला 60जणांचा स्नेह मेळावा..

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला 60जणांचा स्नेह मेळावा..




 अभय वार्ता वृत्तसेवा /कळंब


अमर चोंदे



सन 1999-2000 सालच्या दहावी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. मार्च 2000 मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर सर्वांनी आपापल्या दिशेने मार्गक्रमण केले. त्या प्रवासात अनेकांनी यश, संघर्ष आणि चढउतार अनुभवले; पण आज 25 वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात भेटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो क्षण शब्दात व्यक्त करणे प्रत्येकासाठी अवघड होते.


धकाधकीच्या आयुष्यात सर्वजण आपल्या कामात व्यस्त असले तरी शाळेच्या आठवणी कायम मनात असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.


या वेळी मुख्याध्यापक प्राचार्य नागरगोजे सर यांनी मनोगतात सांगितले की, “सर्व माजी विद्यार्थी निरोगी राहा, एकमेकांच्या गरजेच्या वेळी उपयोगी पडा. आता तुम्ही सर्व पालकाच्या भूमिकेत आहात आणि तुमची जबाबदारी वाढली आहे. समाजाच्या सर्व स्तरात यशस्वी विद्यार्थी हीच श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर खरी ओळख आहे,” असे ते म्हणाले.


दहावी च्या बॅचमधील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वबळावर उद्योग उभे केले, तर काहीजण राजकारणातही पुढे गेले आहेत. काहीजणी पत्रकार,शिक्षक, आदर्श शेतकरी, व्यापारी, नोकरदार, तर काही गृहिणी असून सर्वगुणसंपन्न माजी विद्यार्थ्यांचा हा मेळावा दिवाळीच्या आनंद पर्वणीसारखा ठरला.


25 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शाळेतील गमती-जमती, शिक्षकांच्या शिक्षा, जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांसोबत क्षण साजरे केले.


या कार्यक्रमाला विद्यालयाचे मु.अ. प्राचार्य श्री नागरगोजे बी. एल. यांचे नियोजना नुसार व पर्यवेक्षक श्री लाड एस. पी., माजी मु.अ/प्राचार्य श्री शेप बी. एम.व श्री सोनवणे व्ही. आर. गायकवाड सर, संजय केंद्रे सर, चिलवंत सर, पांचाळ सर , दहिफळे सर यांचे उपस्थितीतयांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे समाजातील योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले.


या मेळाव्यास दहावी बॅचचे सुमारे 60 विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात वेगळी छाप उमटवली असून, त्यांचा अभिमान असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.


कार्यक्रमाचे आयोजन श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर प्रांगणात करण्यात आले होते. गीत-संगीत, नाट्यछटा, मिमिक्री, विनोदी केबीसी, डायलॉग आणि नृत्य सादरीकरणांमुळे वातावरण रंगतदार झाले. जुन्या काळातील प्रसंग आणि शिक्षकांच्या आठवणींनी सर्वांना पुन्हा 25 वर्षांपूर्वीच्या काळात नेले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम बोंदर यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश खेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शनाने अमोल गोळवे यांनी समारोप केला.

========================================




Post a Comment

0 Comments