Type Here to Get Search Results !

उद्या टीम इंडियाचे दोन सामने?

उद्या टीम इंडियाचे दोन सामने?




अभय वार्ता 


क्रिकेट चाहत्यांसाठी ६ ऑक्टोबरचा दिवस खास असणार आहे. उद्या टीम इंडियाचे दोन वेगवेगळे संघ मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही सामने एकाच दिवशी होणार आहेत



भारताचा मुख्य टी-२० संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळणार आहे. हा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता सूरू होईल.



दुसरीकडे, भारत "अ' संघ आणि ऑस्टेलिया 'अ संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला ६ ऑक्टोबरपासून सूरुवात होणार आहे. पहिला सामना पुदुच्चेरी येथे दुपारी २ वाजता सूरू होईल. त्यामळे एकाच दिवशी भारताचे दोन संघ वेगवेगळ्या मैदानांवर खेळताना दिसतील.



भारत आणि वेस्ट डंडिज यांच्यातील टी-२० मालिकेत एकूण पाच सामने होणार आहेत.



 पहिला सामना ६ ऑक्टोबरला लखनौमध्ये, तर पुढील सामने रांची, इंदूर, हैदराबाद आणि बंगळुरू येथे खेळवले जातील भारत 'अ" आणि ऑस्ट्रेलिया 'अ" यांच्यातील वनडे मालिक ६ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. या मालिकेत हादिक पांड्याचे पूनरागमन अपेक्षित होते; मात्र दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली असून सूर्यांश शेडगेचा संघात समावेश करण्यात आला आहे.

========================================












Post a Comment

0 Comments