Type Here to Get Search Results !

धाराशिव नगरपालिकेत सत्तांतराच्या हालचाली; पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

धाराशिव नगरपालिकेत सत्तांतराच्या हालचाली; पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर?






 अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव 


जयनारायण दरक


धाराशिव नगरपालिकेत एका गटातील पाच नगरसेवकांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगरपालिका स्तरावर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असतानाही आर्थिक व राजकीय समीकरणांमुळे विरोधी पक्षातील चार नगरसेवकांनी सत्ताधारी गटात जाण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.


या पाच नगरसेवकांचा गट सध्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची चर्चा असून, पुण्यात मुक्काम केल्यानंतर ते मुंबईत दाखल होणार असल्याचे समजते. सत्ताधारी पक्षात प्रवेशासाठी प्राथमिक पातळीवर हालचाली झाल्या असून, लवकरच या पक्षप्रवेशाला अधिकृत स्वरूप मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.


या राजकीय घडामोडीमागे नेमके कोणते आर्थिक आणि राजकीय समीकरण आहे, याबाबत शहरात विविध चर्चा रंगल्या आहेत. मात्र, या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.


विशेष म्हणजे, संबंधित पाच नगरसेवक नेमके कोण आहेत, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असून त्यांची नावे अधिकृत घोषणा झाल्यानंतरच समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत नेमके काय घडते आणि धाराशिवच्या राजकारणात कोणते नवे समीकरण आकाराला येते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

=========================================










Post a Comment

0 Comments