Type Here to Get Search Results !

ढोकी येथे दोन गटांत तुफान हाणामारी! दहा जण जखमी, २४ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथे दोन गटांत तुफान हाणामारी! 

 दहा जण जखमी, २४ जणांवर गुन्हा दाखल








 अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव 


जयनारायण दरक


धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे पारधी समाजातील दोन गटांमध्ये तुफान राडा झाला या हाणामारीत पाच जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास ढोकी येथील तुळजाभवानी मंदिर (दत्तनगर) परिसरात घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गोरमाळा तालुका बार्शी येथे झालेल्या भांडणाच्या कुरापतीवरून ढोकी येथील राजेश नगर व दत्तनगर पारधी समाजातील लोकांमध्ये अचानक बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले या हाणामारी मध्ये अक्षरशा दगडांचा पाऊस, दिसून आला तसेच चाकूचा वापर आशा सिनेस्टाईलने तुंबळ हाणामारी झाली तुळजाभवानी मंदिराच्या समोर झालेले भांडण लातूर बार्शी राज्य मार्गावर आले तेथे एकमेकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली अक्षरशा दगडांचा पाऊस पाडण्यात आला या दगडफेकीत तुळजाई मेडिकलच्या बाहेरील लाईटची फोडून नुकसान करण्यात आले अनेक व्यापाऱ्याचे नुकसान झाले, लातूर बार्शी राज्य मार्गावर जाणाऱ्या वाहनावर दगड फेक झाली या घटनेची माहिती ढोकी पोलीस स्टेशनचे सपोनी विलास हजारे यांना मिळताच त्यांनी फौज फाट्यासह घटनास्थळ गाठले जमवायला पांगवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला या तुफान हाणामारीत बाबासाहेब चव्हाण, तोळाबाई चव्हाण, राजेंद्र गुलाब चव्हाण, आनंद शामराव पवार ,आप्पा पवार, अनिल दादा शिंदे, सुनील दादा शिंदे , बिश्राम बन्सी पवार यांच्यासह इतर जखमी झाले त्यांच्यावर ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना धाराशिवला पाठवण्यात आले आहे.


सोमवारी सकाळी पुन्हा एकदा अशीच हाणामारी झाली या आरोपींना पोलिसांनी पांगवण्यासाठी धाराशिव येथील पथक पाचारण केले होते याप्रकरणी सरकार पक्षातर्फे पोलीस नाईक रविकांत मधुकर जगताप यांच्या फिर्यादीवरून वरून वरील आरोपीवर कलम ११०, १८९ (२),१८९(३),१९०,१९१(२),१९१(३),३२४(४) या कलमाद्वारे दाखल करण्यात आला आहे.


दत्तनगर परिसरातील 50 ते 60 नागरिकांनी रात्री उशिरा ढोकी पोलीस स्टेशनला जाऊन या लोकांचा सतत त्रास आहे यांचा बंदोबस्त करावा अशी तक्रार नोंदवली आहे.



आरोपींची नावे:

1. दत्तनगर पारधीपिढी: बबलू रामचंद्र काळे, शोभनाथ राजू काळे, तनु बिसराम पवार, राहुल भिमराव पवार, बापू बब्बू शिंदे, शिवकुमार रमेश काळे, रमेश बब्बू काळे, राजेंद्र बब्बू काळे, आनंद शामराव पवार, बिसराम बन्सी पवार इतर पाच जण 


2. राजेशनगर पारधीपिढी: ओमकार दत्ता चव्हाण, अनिल नवसाची चव्हाण, शुभम शहाजी चव्हाण, रवि शहाजी चव्हाण, विभीषण शिवाजी चव्हाण, बाबासाहेब आप्पा चव्हाण, शाम बाबासाहेब चव्हाण, नहादू बाबासाहेब चव्हाण, करण सुनील चव्हाण, सुनील शहाजी चव्हाण, दत्ता नाना चव्हाण, महादेव राजेंद्र चव्हाण, आप्पा मोतीराम चव्हाण, राजेंद्र गुलाब चव्हाण यांच्यासह इतर पाच जण

=========================================





                            🔺अभय वार्ता 🔺 

                         बातम्या व जाहिरातीसाठी

                               जयनारायण दरक

                                 8378 920 419

Post a Comment

0 Comments