Type Here to Get Search Results !

कळंब येथे आज ज्येष्ठ पत्रकार व गुणवंत पाल्यांचा भव्य सत्कार सोहळा; मान्यवरांची लाभणार प्रमुख उपस्थिती

कळंब येथे आज ज्येष्ठ पत्रकार व गुणवंत पाल्यांचा भव्य सत्कार सोहळा; मान्यवरांची लाभणार प्रमुख उपस्थिती







 अभय वार्ता  / कळंब


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, शाखा कळंबच्या वतीने आज मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कळंब येथील पंचायत समितीच्या सभागृहात हा सोहळा संपन्न होणार असून, जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कळंब पत्रकारांच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमात पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १० ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच पत्रकारांच्या २० गुणवंत पाल्यांचा (विद्यार्थ्यांचा) आणि समाजात उत्कृष्ट कार्य करणारे उद्योजक व डॉक्टरांचाही गौरव या सोहळ्यात केला जाणार आहे.मान्यवरांची मांदियाळीया सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक रितू खोखर, कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार हेमंत ढोकणे, सीनियर क्राईम रिपोर्टर अक्षय फाटक, पोलीस निरीक्षक शकील शेख, कॅनवास स्कूलचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र नरहिरे आणि अनिश फायनान्सचे संस्थापक विश्वनाथ अण्णा तोडकर उपस्थित राहणार आहेत.


तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे उपविभागीय सचिव सचिन शिवशक्ती, जिल्हाध्यक्ष रहीम शेख, गटविकास अधिकारी सोपान अखीले, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. एम. तळेकर, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर बी. एम. तांबारे आणि जिल्हा परिषद शाळा आढाळाचे आदर्श मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड आदी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडणार आहे.कळंब येथील पंचायत समिती सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बांधवांनी वेळेवर उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे जाहीर आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, शाखा कळंबच्या अध्यक्ष वतीने करण्यात आले आहे.

=========================================




                           🔺अभय वार्ता 🔺

                       बातम्या व जाहिरातीसाठी

                            जयनारायण दरक

                               8378 920 419

Post a Comment

0 Comments