Type Here to Get Search Results !

मोहा येथील भवानी चौक ते शिवाजी चौक सिमेंट रोड पूर्ण परंतु,       रस्ता तयार, नाली गायब तर गुत्तेदार नॉट रिचेबल.

मोहा येथील भवानी चौक ते शिवाजी चौक सिमेंट रोड पूर्ण परंतु,        

रस्ता तयार, नाली गायब तर गुत्तेदार नॉट रिचेबल.

संबंधित विभागाचे कानावर हात तोंडावर बोट हे धोरण.





    अभय वार्ता / धाराशिव 


कळंब तालुक्यातील मोहा येथील भवानी चौक ते शिवाजी चौक या सिमेंट रस्त्याचे बऱ्याच दिवसापासून अनेक अडचणींचा व अडथळ्याचा सामना करत असलेला रस्त्याला मुहूर्त मिळाला आणि सिमेंट रस्त्याचे काम चालू झाले. जवळपास दोन ते तीन फूट उंचीचा रस्ता तयार झाला. परंतु रस्त्यालगत नालीचे काम मात्र झाले नाही.ते का झाले नाही हा संशोधनाचा विषय बनला आहे. रस्त्याची उंची वाढल्याने रस्त्यालगत असणारी घरे मात्र खाली आणि रस्ता वर झाला. साहजिकच येऊ घातलेल्या पावसाळ्यातील पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जाऊन जीवित व वित्त हानी होण्याची मोठी शक्यता आहे. व घराला एखाद्या बेटाचे स्वरूप येण्याची शक्यता आहे. पुढील अनर्थ टाळण्यासाठी संबंधित विभागाने गुत्तेदाराला पावसाळ्यापूर्वी नालीचे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट सांगावे.अन्यथा पुढील होणाऱ्या नुकसानीस संबंधित विभाग व गुत्तेदार जबाबदार राहतील.

         याबाबत सविस्तर वृत्त असे की कळंब तालुक्यातील मोहा येथील भवानी चौक ते शिवाजी चौक हा रस्ता बऱ्याच दिवसापासून कोणत्या न कोणत्या कारणास्तव प्रलंबित होत होता. एखाद्या शापित रस्त्यागत याची दयनीय अवस्था झाली होती. कधी लाल, कधी पांढऱ्या तर कधी वेगळ्याच रंगाच्या फितीत अडकलेल्या रस्त्याचे भाग्य उजाडले आणि मागील काही दिवसात काम झाले तसा रस्त्याने मोकळा स्वास घेतला तर जनतेला हायसे वाटले. या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली होती की पायी जाणाऱ्या लोकांना ही रस्त्याने धड चालता येत नव्हते. एवढेच नाही तर हा रस्ता नरकाचे द्वार बनला होता. कधी शासन प्रशासनाच्या अनास्थेच्या,कधी बजेटच्या, तर कधी गुत्तेदाराच्या कात्रीत सापडलेल्या रस्त्याचे कसेतरी काम चालू झाले.



           रस्ता झाला नालीचे काय झाले.

          ===================

रस्त्याचे काम झाले परंतु आधी कळस मग पाया असे झाले. रस्ता करण्या अगोदर नालीचे काम व्हायला पाहिजे. परंतु तसे न होता.गुत्तेदार साहेबांनी अगोदर दोन ते तीन फुट उंचीच्या सिमेंटच्या रस्त्याचे काम केले. रस्ता तयार होऊन महिनाभराचा काळ लोटला पण नालीचे काम अद्याप चालू झाले नाही. आतापर्यंत सर्वसाधारणपणे रस्त्याच्या अगोदर नालीचे काम पाहिजे पण तसे न होता आधी रस्ता मग नाली असे झाले. मग नाली आहे की नाही. जर नाली नसेल तर बाजूच्या घराचे काय. पावसाचे पाणी घरात घुसून जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता आहे.हे म्हणजे धुरळ्यातून उठायचे आणि फुपूट्यात नाचायचे असेच झाले.



          संबंधित विभागाला ग्रामपंचायत चे निवेदन.

       ==========================

पावसाळा तर जवळ येऊन ठेपला रस्त्याचे काम तर झाले परंतु नालीचे काम केंव्हा होणार यासाठी गुत्तेदाराची वाट पाहिली परंतु गुत्तेदार नॉट रिचेबल तर संबंधित विभाग अन अव्हेलेबल.रस्त्याच्या कामानंतर काही दिवस गुत्तेदार नालीचे काम करतो की नाही याची वाट ग्रामपंचायत ने पाहिली.अद्याप काम चालू ना झाल्याने. ग्रामपंचायत ने संबंधित विभागाला दि. 18 मे 2026 रोजी निवेदन दिले असून पावसाळ्यापूर्वी नालीचे काम पूर्ण करण्यात यावे. न झाल्यास नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीस संबंधित विभाग व गुत्तेदार पूर्णपणे जबाबदार असतील अशा आशयचे निवेदन दिले आहे.

=========================================












Post a Comment

0 Comments