Type Here to Get Search Results !

तेर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई 

 तेर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई 




 अभय वार्ता  / धाराशिव 

मा.आयुक्त श्री.डॉ. राजेश देशमुख, मा.श्री. प्रसाद सुर्वे सहआयुक्त, (दक्षता व अंमलबजावणी) राज्य उत्पादन शुल्क, श्रीमती संगीता दरेकर, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, छ. संभाजीनगर विभाग छ. संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. हर्षवर्धन शिंदे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि. धाराशिव यांचे नेतृत्वात दि.१२/०४/२०२६ रोजी प्राप्त खात्रीलायक बातमीवरुन आरोपीचे ताब्यातील समाज मंदिराच्या पाठीमागे असलेल्या विट बांधकाम केलेली खोली पारधी वस्ती मौजे तेर ता. जि. धाराशिव येथे प्रो. गुन्हेकामी छापा मारुन गोवा राज्य निर्मीत व केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेल्या अॅड्रियल या मद्याचे ७५० मिली क्षमतेचे एकुण ४२ बॉक्स व गुन्हयात वापरण्यात आलेले बनावट प्लास्टिक बुच व इतर साहित्य असा एकुण रु.१,४१,७७५/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हयातील आरोपी फरार आहे. त्याचे विरुध्द म.दा.का १९४९ चे कलम ६५ ई,क, ८०,८१,८३,९० व १०३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई ही श्री.हर्षवर्धन शिंदे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि. धाराशिव यांचे नेतृत्वा खाली बाळकृष्ण त्रि. ढोकरे, प्र. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जि.धाराशिव सोबत श्री. जर्नाधन अंभुरे दु.नि., श्री.नंदकुमार शिंदे दु.नि. ए.ए.गवंडी, टी.एच. नेर्लेकर, ए.सी. खराडे, ए.डी.गटकांबळे, श्रीमती. ऐश्वर्या इंगळे महिला जवान तसेच संग्राम झेंडे, ज्ञानेश्वर गुंजाळ, संग्राम गोरे, अमाले पवार, अभिषेक पवार, चैतन्य मोरे (सर्व रा उ शु जवान) तसेच श्री. एजाज शेख ज.नि. वाहन चालक यांनी सदरची कारवाई यशस्वी केली असुन पुढील तपास बाळकृष्ण त्रि. ढोकरे, प्र.निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जि. धाराशिव हे करीत आहेत.


जिल्हयातील अवैध मद्य निर्मीती वाहतुक व विक्रीबाबतची माहिती या कार्यालयास कळविणे बाबत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि. धाराशिव यांनी जनतेला आवाहन केले आहे.

======================================








Post a Comment

0 Comments