Type Here to Get Search Results !

बहुला येथे बिक्कड परिवाराच्या वतीने 250 ज्ञानेश्वरी व हरीपाठाचे वाटप 

बहुला येथे बिक्कड परिवाराच्या वतीने 250 ज्ञानेश्वरी व हरीपाठाचे वाटप 





 अभय वार्ता / कळंब 


कळंब. तालुक्यातील बहुला येथे चालू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली च्या समाधीस 750 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आई-वडिलांच्या स्मृती प्रत्यर्थ बहुला गावातील भावी भक्तांना कै. त्रिंबक बिक्कड यांचे चिरंजीव सध्या पुणे येथे स्थायिक असलेले श्री. अनिल, सुनील व विष्णू या बंधूंनी 250 पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथ व सार्थ हरीपाठाचे सांप्रदायिक क्षेत्रात कार्यरत असणारे बहुला गावचे सुपुत्र ह.भ.प.आदरणीय श्री प्रदिप यादव महाराज व मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले. 


या सांप्रदायिक व पवित्र कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी ह भ प प्रदीप महाराज यादव यांनी बिक्कड कुटुंबाचे अभिनंदन करून या चांगल्या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या आचार विचारावर हे समाजाचे मार्गक्रमण चालु आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची ज्ञानेश्वरी हा ग्रंथ बिक्कड परिवाराने भावी भक्तांना दिल्याबद्दल या कुटुंबाचे मनस्वी आभार मानले. ज्यांना ज्यांना सदरील ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मिळालेला आहे अशांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी ज्ञानेश्वरीचे वाचन करून त्या मार्गावर चालावे अशी प्रतिपादन केले.

=======================================




Post a Comment

0 Comments