अभय वार्ता वृत्तसेवा /शिराढोण
जयनारायण दरक
शिराढोण पोलीस ठाण्याच्या पथकाने कळंब तालुक्यातील ढोराळा व माळकरंजा येथे अवैध दारूविक्रीवर मोठी कारवाई करत दोन इसमांकडून देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला असून, महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, पहिल्या प्रकरणात ढोराळा येथे राहणाऱ्या 32 वर्षीय इसमास दि. 04 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास ढोराळा ते मुरुड रस्त्यालगत दुकानाच्या शेडजवळ अंदाजे 480 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या 12 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीसाठी जवळ बाळगल्याच्या आरोपावरून पोलीसांनी ताब्यात घेतले. सदर बाटल्या जप्त करून संबंधित इसमाविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम 65(ई) अन्वये शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या प्रकरणांमध्ये माळकरंजा येथील 29 वर्षीय इसमाकडून दि. 05 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास माळकरंजा ते खामसवाडी रस्त्यालगत एका हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत अंदाजे 1,160 रुपये किंमतीच्या 29 देशी-विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूचा अवैध विक्रीसाठी साठा करून ठेवण्यात आल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशी माहिती "अभय वार्ता"शी पोलिस प्रशासनांने दिली.
------------------------------------------------------------------------
सौजन्य;
विश्वकर्मा
फर्निचर & इंटरियर
मंगरूळ ता. कळंब जि. धाराशिव
लाकडी चौकटी, दरवाजे व इतर सर्व कामे केले जातील.
कुमार बळीराम पांचाळ
========================================

.jpg)

Post a Comment
0 Comments