Type Here to Get Search Results !

रॉयल मित्र प्रेम पारा क्रिकेट संघाने पटकावले वाशी प्रिमियर लीग सिजन 6 चे विजेतेपद 

रॉयल मित्र प्रेम पारा क्रिकेट संघाने पटकावले वाशी प्रिमियर लीग सिजन 6 चे विजेतेपद 






अभय वार्ता वृत्तसेवा/ वाशी 


वाशी तालुक्यातील शिवसेना उबाठाचे नेते प्रशांत बाबा चेडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वाशी प्रीमियर लीग सीजन सहा चे प्रथम विजेतेपद रॉयल मित्र प्रेम क्रिकेट संघ पारा ने पटकावले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



 धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते मा.प्रशांत बाबा चेडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वाशी प्रीमियर लीग सीजन सहा चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील आठ संघाने सहभाग नोंदवला होता. यामध्ये फायनल मध्ये गुरुवारी दुपारी वाशी तालुक्यातील पारा येथील रॉयल मित्र प्रेम क्रिकेट संघ च्या विरुद्ध रायगड वारियर्स वाशी संघात सामना रंगला होता. यात रॉयल मित्र प्रेम संघाने 59 धावांनी हा सामना जिंकला. यातील प्रथम पारितोषिक नितीन तात्या चेडे यांच्या कडून 51111रुपये पारा संघाने तर द्वितीय पारितोषिक प्रसाद काका जोशी आणि दत्ता कवडे पाटील यांच्या कडून 31111 रुपये रायगड वॉरियर्स वाशी संघाने पटकावले. 



              रॉयल मित्र प्रेम क्रिकेट संघ पारा चे संघमालक अनिकेत भैय्या घरत तसेच कर्णधार रोहित शेळके,संतोष चौधरी,जिवन मस्के,दिपक सिरसट,प्रदिपशिनगारे,शंकर तोडकर,आशिष उंदरे,विशाल खवले,अमोल कवडे,सुरज कवडे,अक्षय कवडे,सुरज जाधव,बेस्ट बाॅलर म्हणून तुषार उंदरे,बेस्ट बॅटसमन विनोद बोराडे स्पर्धेचे मालिकावीर प्रदिप शिनगारे हे ठरले असून या सर्वांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

---------------------------------------------------------------------



Post a Comment

0 Comments