Type Here to Get Search Results !

धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती

धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती




 अभय वार्ता /वृत्तसेवा (धाराशिव)


जयनारायण दरक 


राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) धाराशिवच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


या बाबत सविस्तर वृत्त असे की, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आणि संजय निंबाळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांनी अचानकपणे राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना या नियुक्तीचे पत्र (काल) मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.


 या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे व पक्षाचे कार्यालयीन सरचिटणीस रविंद्र पवार, राज्याचे सरचिटणीस बबन कनावजे, ग्रामीण युवती प्रदेशाध्यक्ष अमृता काळदाते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

========================================

सौजन्य:

 राधा कृष्ण

 द वर्ल्ड ऑफ प्युअर व्हेज रेस्टॉरंट 

 जंत्रे प्लाझा च्या समोर जिजाऊ चौक ढोकी रोड कळंब,

 अमित माळी, 9527197374


========================================





Post a Comment

0 Comments