Type Here to Get Search Results !

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई 

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई 



अभय वार्ता वृत्तसेवा/ धाराशिव 


जयनारायण दरक 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक २०२५ चे अनुषंगाने निवडणुक आदर्श आचार सहिंतेच्या काळात काल दि.२८/११/२०२५ रोजी राज्य उत्पादन शुल्क, जि.धाराशिव विभागाने विभागाचे मा.आयुक्त, श्री. राजेश देशमुख, मा. सहआयुक्त, (दक्षता व अंमलबजावणी) राज्य उत्पादन शुल्क, श्री. प्रसाद सुर्वे, श्रीमती संगीता दरेकर, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, छ. संभाजीनगर, श्री.बी.एच. तडवी, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड विभाग नांदेड यांचे आदेशान्वये संयुक्त मोहिमेचे आयोजन करुन श्री. हर्षवर्धन शिंदे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि.धाराशिव तसेच श्री. केशव राऊत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातुर यांचे मार्गदर्शनाखाली मौजे तावरजखेडा तांडा व मौजे जागजी तांडा ता. जि.धाराशिव अवैध हातभट्टी दारु निर्मीती ठिकाणावर छापा मारुन सदर ठिकाणी एकुण ०८ गुन्हे नोंद करुन ०८ आरोपींना अटक करुन त्यांचे ताब्यातुन एकुण रु.२,६७,९५०/- किंमतीचा प्रो. गुन्हयातील गुळमिश्रीत रसायन व हातभट्टी दारुचा साठा जप्त करुन नाश करण्यात आला.



सदर ची कारवाई श्री.हर्षवर्धन शिंदे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि.धाराशिव व श्री. केशव राऊत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातुर यांचे मार्गदर्शनाखाली राहुल बांगर, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव, बाळकृष्ण ढोकरे, प्र.निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जि. धाराशिव, उत्तम रामगुडे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव, आर. के. बागवान, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जि.धाराशिव, सोबत एम.पी.कंकाळ, ए.ए.गवंडी, टी.एच. नेर्लेकर, ए.ए., खराडे, ए.डी. गटकांबळे, संतोष कलमले, ए.एम. सोनकांबळे, महिला जवान ऐश्वर्या इंगळे, कोमल कसबे, व्ही.आय. चव्हाण, महेंद्र पातकळ तसेच श्री. कोतवाल, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातुर, श्रीमती यु.व्ही. मिसाळ, प्र.निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, लातुर व त्यांचा स्टाफ यांनी सदरची कारवाई यशस्वी केली असुन पुढील तपास बाळकृष्ण ढोकरे, प्र.निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जि. धाराशिव, उत्तम रामगुडे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव हे करीत आहेत.


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक २०२५ चे कालावधीत अवैध मद्य निर्मीती वाहतुक व विक्रीबाबतची माहिती गुप्तपणे या कार्यालयास कळविणेबाबत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि. धाराशिव यांनी जनतेला आव्हान केले आहे.

Post a Comment

0 Comments