Type Here to Get Search Results !

कळंब नगर परिषद निवडणुक नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 94 उमेदवारांची अर्ज वैद्य.               

कळंब नगर परिषद निवडणुक नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 94 उमेदवारांची अर्ज वैद्य.                  

          



अभय वार्ता वृत्तसेवा/ कळंब 


माधवसिंग राजपूत


 कळंब नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 निवडणूक प्रक्रिया सुरू असून दिनांक 18 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली यामध्ये नगराध्यक्ष पदांसाठी 9 उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरले असून नगरसेवक पदासाठी 94 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैद्य तर 66 उमेदवारी अर्ज अवैद्य झाले छाननी मध्ये अवैद्य ठरलेल्या अर्जामध्ये अर्जावर सूचकाची सही नसणे, उमेदवाराचा मतदार यादीतील क्रमांक नसणे, तसेच नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवाराच्या दुय्यम ,डमी, उमेदवार नामनिर्देशन पत्रावरावर देखील एकच सूचक असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य झाला, याचबरोबर दोन पक्षात जागावाटप समझोत्यात ऐनवेळी बदल केल्याने नामनिर्देशन पत्रावर एक पक्षाचे चिन्ह व त्याला ए बी फार्म मित्र पक्षाचा असा प्रकार घडला, तर प्रभाग क्रमांक चार ब या प्रभागात शिवसेना उमेदवार संगीता संजय घुले यांचे पती संजय घुले यांची नोंद कंत्राटदार असल्याचे कारण दाखवीत नामनिर्देशन पत्र अवैद्य ठरविण्यात आले, यानंतर उमेदवारानी अपिलात जाण्याचा निर्णय घेतला असून संजय घुले यांनी कंत्राटाची मागणी केली होती प्रत्यक्षात कुठेही कंत्राटदार म्हणून काम केले नाही अशी त्यांच्या कडून बाजू मांडण्यात आली नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असून नगरसेवकासाठी प्रत्येक प्रभागातून दोन अ व ब जागेसाठी 20 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत प्रभाग व वैद्य ठरलेले उमेदवार प्रभाग क्रमांक 1 अ तीन ब पाच , प्रभाग क्रमांक 2, अ, तीन, ब, सात, प्रभाग क्रमांक 3 अ ,तीन,ब नऊ, प्रभाग क्रमांक 4 अ, सहा, ब तीन , प्रभाग क्रमांक 5, अ,तीन ब,चार ,प्रभाग क्रमांक 6 अ तिन , ब चार, प्रभाग क्रमांक 7, अ दोन,ब सहा, प्रभाग क्रमांक 8, अ सहा,ब,दहा, प्रभाग क्रमांक 9 अ तीन, ब चार प्रभाग क्रमांक 10, अ ,चार,ब सहा उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र वैद्य ठरले आहे दिनांक 21 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येतील तसेच न्यायालयीन अपील झाले असल्यास व त्या वर सुनवणी झाल्यास 24 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येतील .कळंब नगरपरिषदेसाठी विधी ग्राह्य पद्धतीने नामनिर्देशन केलेल्या उमेदवाराची यादी


कापसे राणी उर्फ सुनंदा शिवाजी,

खान अमरीन जावेद,गोरे कविता निवृत्ती, चोंदे मीराबाई भागवत, बनसोडे मनीषा सतपाल,भवर मिनाक्षी श्रीधर

मुंदडा रश्मी संजय,शेख शेहनाज अनीस ,सपाटे ज्योती प्रकाश. यांचा समावेश आहे.

=========================================




Post a Comment

0 Comments