राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!
शुभेच्छुक; श्री. अरुण चौधरी कळंब, ग्रामीण पश्चिम मंडल- तालुकाध्यक्ष
🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️
========================================
तुळजापूर लवकरच रेल्वेच्या नकाशावर ३२९५ कोटींच्या सोलापूर-तुळजापूर-धाराशिव मार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी
अभय वार्ता वृत्तसेवा /मुंबई
आई तुळजाभवानीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सोलापूर–तुळजापूर–धाराशिव या ३२९५ कोटी रुपयांच्या नव्या रेल्वेमार्ग प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे तुळजापूर हे पवित्र तीर्थक्षेत्र आता लवकरच रेल्वेच्या नकाशावर दाखल होणार असून, महाराष्ट्रासह देशभरातील भाविक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे,अशी माहिती परिवहनमंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक्त भागीदारीतून सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार आहे.या प्रकल्पात राज्य शासनाचा निम्मा वाटा असेल.
या लोहमार्गामुळे श्री क्षेत्र पंढरपूरसह तुळजापूर देखील रेल्वेच्या थेट जोडणीमध्ये येईल. दरवर्षी लाखो भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात.त्यामुळे या प्रकल्पामुळे तीर्थयात्रा सुलभ होणार असून स्थानिक अर्थव्यवस्था आणि पर्यटनालाही चालना मिळेल.
धाराशिव जिल्ह्यातून हा मार्ग जाणार असल्याने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याची शक्यता पालकमंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली.
🔸 मुख्य ठळक मुद्दे:
सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वेमार्गाला प्रशासकीय मान्यता
प्रकल्प खर्च: ₹३२९५ कोटी
लांबी: ९६ किमी ब्रॉडगेज मार्ग
राज्य व केंद्र शासनाची संयुक्त भागीदारी
========================================
तुळजापूर तीर्थक्षेत्राला नवा रेल्वे ओळख क्रमांक 🚄

.jpg)

Post a Comment
0 Comments