पूरग्रस्त कुटुंबासोबत महसूल प्रशासनाने केली दिवाळी साजरी.
अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव
जयनारायण दरक
मौजे.लाखी ता.परंडा येथे गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाणगंगा नदीला पूर आल्यामुळे लाखी गावातील अनेक नागरिक पुरात अडकले होते. प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांना सुरक्षित बाहेर काढले परंतु पूरामुळे अनेक कुटुंबाचे संसार उध्वस्त झाले तर शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेली पीक पाण्यात वाहून गेले त्यामुळे बऱ्याच कुटुंबात दिवाळी साजरी करण्यात आली नव्हती.
त्या कुटुंबाला धीर देत महसूल प्रशासनाचे कर्मचारी ग्राम महसूल अधिकारी,माहदेव शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी, कल्याण जाधव,डि.व्ही.सिरसेवाड पाटील इतर कर्मचाऱ्यांनी मिळून लाखी या गावी जाऊन त्या शेतकऱ्यांना धिर दिला व त्या कुटुंबाला दिवाळी साहित्य देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली.
-----------------------------------------------------------------------


Post a Comment
0 Comments